दर्जेदार आणि विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी अभिनेते अनुपम खेर ओळखले जातात. विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिकांपर्यंत सर्वच प्रकारच्या अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर छाप सोडली आहे. अनुपम खेर अभिनयाव्यतिरिक्तही इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. राजकारण आणि सोशल मीडियावरही त्यांच्या वक्तव्यांची आणि विविध विषयांवर असणाऱ्या ठाम भूमिकांची चर्चा होते. ‘द अनुपम खेर शो- कुछ भी हे सकता है’ या कार्यक्रमाद्वारे अनुपम खेर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कैक पैलू पाहण्याची संधीही रसिकांना मिळाली आहे. चाहत्यांसोबत जुळलेला हा दुवा अनुपम खेर यांनी इतक्यावरच न थांबवता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहिले आहेत म्हणावे लागेल. नुकतेच अनुपम खेर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हि़डिओमध्ये अनुपम खेर यांनी अवघ्या काही मिनिटांतच व्यक्तिमत्त्वाची परिभाषा सांगितली आहे.
‘वयक्तिमत्तव किंवा ‘पर्सनालिटी’ या शब्दाचा तुम्ही कसे दिसता याच्याशी काहीही संबंध नसतो. ‘पर्सनालिटी’ म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच स्वत:चा स्वीकार करणे आणि ‘चार्म’ म्हणजे स्वत:मधील कमीपणाचा स्वीकार करणे. अनेकांकडून बऱ्याचदा इतरांचा कमीपणा वारंवार अधोरेखित केला जातो’ असे म्हणत खेर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये इतक्यावरच न थांबता ‘जर तुम्ही उंच आहात तर त्याचा आनंद घ्या, जर तुम्हा ठेंगणे आहात तर त्याचाही आनंद घ्या. मला केस नसल्यामुळे अनेकजण माझी खिल्ली उडवतात’ असेही म्हणत अनुपम खेर यांनी या व्हिडिओला एका विनोदी शैलीत संपवले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सिनेरसिकांमध्ये चर्चेत आहे. अनुपम खेर त्यांच्या याच व्हिडिओमुळे चर्चेत नसून त्यांनी यापूर्वीही इतर व्हिडिओ शेअर केले आहेत.
व्हिडिओमुळे चर्चेत नसून त्यांनी यापूर्वीही इतर व्हिडिओ शेअर केले आहेत.