27 February 2021

News Flash

“लो बजेट हॅरी पॉटर”; अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

स्कूटीवर झाडू अडकवून स्टंट मारणाऱ्या तरुणाची अनुपम खेर यांनी उडवली खिल्ली

अनुपम खेर हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जातात. अभिनयासोबत ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते चक्क हॅरी पॉटरमुळे चर्चेत आहेत. अनुपम खेर यांनी एका बाईक चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या तरुणानं आपल्या बाईकवर पाठीमागे एक झाडू लावली आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून “हा पाहा लो बजेट हॅरी पॉटर” असं म्हणत त्यांनी या तरुणाची फिरकी घेतली आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ उत्तराखंड येथे शूट केलेला आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की शहर… पाहा मायकल जॅक्सनचं अब्जावधींचं घर

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

हॅरी पॉटर ही एक लोकप्रिय कादंबरी आहे. प्रसिद्ध लेखिका जे.के. रोलिंग यांनी ही कादंबरी लिहिली होती. हॅरी पॉटर नावाचा एक मुलगा आणि त्याचं जादूई जग यावर आधारित ही कादंबरी आहे. आजवर या कादंबरीवर आधारित अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती देखील झाली आहे. या चित्रपटांमध्ये हॅरी पॉटर आकाशात उडण्यासाठी झाडूचा वापर करतो. अगदी त्याच प्रमाणे बाईक चालवणारा हा तरुण देखील आकाशात उडण्याचा प्रयत्न करतोय की काय? अशी गंमतीशीर शंका अनुपम खेर यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 6:34 pm

Web Title: anupam kher shared video low budget harry potter mppg 94
Next Stories
1 ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा अभिनेता करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
2 प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा सोफ्यावरील रोमॅण्टिक फोटो आणि…
3 ‘नक्सलबाडी’ वेब सीरिजला प्रेक्षक-समीक्षकांची पसंती
Just Now!
X