06 December 2019

News Flash

प्रसिद्ध अभिनेत्याला ३३व्या वर्षीच करावी लागली आजोबाची भूमिका

बॉलिवूडमध्ये सध्या थ्रोबॅक पिक्चर असा ट्रेंड सुरू आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या थ्रोबॅक पिक्चर असा ट्रेंड सुरू आहे. अनेक कलाकर #ThrowBackPictureअसा हॅशटॅग वापरुन आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आतापर्यंत रणवीर सिंग, इलियाना डिक्रूज, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, विकी कौशल यांसारख्या अनेक कलाकारांनी आपले थ्रोबॅक पिक्चर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता या यादीत जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे देखील नाव जोडले गेले आहे. त्यांनी अलिकडेच आपला एक जुना फोटो इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

अनुपम खेर जेव्हा ३३ वर्षांचे होते तेव्हाचा हा फोटो आहे. या ग्रुप फोटोत त्यांच्यासोबत यश चोप्रा, हेमा मालिनी, राजेश खन्ना, अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्रि, ऋषी कपूर आणि इतर कलाकार दिसत आहेत. “हा फोटो यश चोप्रा यांच्या ‘विजय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काढला गेलेला आहे. तेव्हा मी अवघ्या ३३ वर्षांचा होतो. या चित्रपटात मला ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे वडिल, सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सासरे आणि अनिल कपूर यांच्या आजोबांची भूमिका साकारावी लागली होती.” असे कॅप्शन देत अनुप खेर यांनी हा फोटो शेअर केला आहे.

अनुप खेर यांच्या या थ्रोबॅक पिक्चरला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्दी मिळत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी या फोटोवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First Published on December 3, 2019 12:20 pm

Web Title: anupam kher shares throwback picture mppg 94
Just Now!
X