News Flash

‘दिल बेचारा’मुळे अनुपम खेर यांच्या डोळ्यांतून वाहू लागले अश्रू; म्हणाले…

सुशांतच्या 'दिल बेचारा'वर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान अभिनेते अनुपम खेर यांनी देखील ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. आम्हाला तुझी कायम आठवण येईल, असं म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केलं.

“प्रिय सुशांत सिंह राजपुत, दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित झाला. भौतिक जगात तू आमच्यासोबत नाहीस याचं कायम दु:ख राहिल. तुझा हा चित्रपट आम्ही मनापासून पाहू. हा चित्रपट पाहून आमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतील. आम्हाला तुझी कायम आठवण येईल.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 11:18 am

Web Title: anupam kher tweet sushant singh rajput dil bechara mppg 94
Next Stories
1 करणसोबत काम करण्यासाठी सुशांतने माझ्या चित्रपटाला नकार दिला होता- अनुराग कश्यप
2 छोट्या पडद्यावरील अभिनेत्याच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू, आईलाही झाला संसर्ग
3 Kargil Vijay Diwas: …अन् ‘त्या’ फोन कॉलवर दिलीपकुमार यांनी नवाज शरीफ यांना झापले
Just Now!
X