माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आले. त्यांना सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री ८.४५ च्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकरात लवकर ठिक व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. ‘मी देवाकडे प्रार्थना करतो की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लवकरात लवकर ठिक होऊन घरी परतावेत’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मेरी प्रभु से प्रार्थना है कि पूर्व प्रधानमंत्री #मनमोहन_सिंह जी जल्दी ही पूर्ण रूप से स्वास्थ्य होकर अपने घर लौटें। Wishing former Prime Minister #DrManmohanSingh ji a very speedy recovery.
— Anupam Kher (@AnupamPKher) May 11, 2020
रविवारी रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. “मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत मी चिंतीत आहे. ते लवकर बरे होतील अशी मी अपेक्षा करतो. संपूर्ण देश त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे,” असे ते म्हणाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 5:47 pm