प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर मुक्तपणे व्यक्त होताना दिसतात. यावेळी अनुपम खेर यांनी “होय मी एक काश्मिरी पंडित आहे.” असे म्हणत ३० वर्षांपूर्वीच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे.

कुख्यात टोळीतला गुन्हेगार ते प्रसिद्ध धावपटू…!

जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री; यांना पुरुष म्हणावे की महिला?

१९ जानेवारी १९९० हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. कारण त्या दिवशी काश्मिरी पंडितांना खोरे सोडून बाहेर जावे लागले होते. या घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अनुपम खेर यांनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारवरवर टीका केली आहे.

काय म्हणाले अनुपम खेर?

अनुपम यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी काश्मिरी पंडितांच्या वेदना सांगितल्या आहेत. ज्यावेळी त्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर जाण्यास सांगितले होते. तेव्हा या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला होता. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

याशिवाय त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आहे. “या फोटोत दुसऱ्या रांगेत डाव्या बाजूस उभे आहेत ते माझे आजोबा आहेत. ३० वर्षांपूर्वी त्यांनी विचारही केला नसेल की त्यांना काश्मिर सोडून जावे लागेल.” अशा आशयाचा मजकूर अनुपम खेर यांनी या फोटोवर लिहिला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.