25 November 2020

News Flash

अनुपम खेर यांचा मुलगा झाला बेरोजगार?; सोशल मीडियावरुन मागतोय काम

कोणी काम देतं का काम; अनुपम खेर यांचा मुलगा मागतोय काम

बॉलिवूड सिनेसृष्टीवर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ही इंडस्ट्री सेलिब्रिटी किड्सला पहिलं प्राध्यान्य देते, असं म्हटलं जात. परंतु या गटबाजीच्या वातावरणात काही कलाकार असेही आहेत ज्यांच्याकडे बिलकूल काम नाही. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर हा सेलिब्रिटी किड असूनही कामाचा शोध घेत आहे. त्याकडे सध्या बिलकूल काम नाही. परिणामी “काही काम असेल तर मला सांगा” अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे.

अवश्य पाहा – बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी

अवश्य पाहा – ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी

सिकंदरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा चेहरा थोडा त्रासदायक दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून तो काम मागत आहे. “कोणाकडे काही काम असेल तर सांगा, मला कामाची गरज आहे. मी हसू देखील शकतो.” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनुपम खेर एक अष्टपैलू अभिनेते आहेत. ते बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. निर्माते त्यांना सतत कामाविषयी विचारत असतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाकडे काम नाही हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 2:26 pm

Web Title: anupam khers son sikander kher shares post asking for work mppg 94
Next Stories
1 Bigg Boss च्या घरात होणार एकता कपूरची एंट्री; मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही सोबत दिसणार
2 अभिनेता निखिल द्विवेदीला झाली करोनाची लागण
3 ‘आता फक्त एल्गार !’; राजन पाटील यांची पोस्ट चर्चेत
Just Now!
X