News Flash

सेटवर असतानाच आईचा फोन आला…, ‘अनुपमा’मधील अभिनेत्याच्या वडिलांचं निधन

काही दिवसांपूर्वी त्यांना करोना झाला होता.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये काम करणारा अभिनेता पारस कलनावतचे वडिल भूषण कलनावत यांचे निधन झाले आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पारस त्याच्या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होता. दरम्यान सेटवर चित्रीकरण सुरु असताना पारसच्या आईचा फोन आला. त्यांना बोलताही येत नव्हते. आईचा आवज ऐकून पारस सेटवरुन बाइक घेऊन तातडीने घरी गेला. त्याच्या पाठोपाठ मालिकेत त्याच्या आईची अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली आण सुधांशू पांडे पारसच्या घरी पोहोचले.

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पारसला त्याच्या आईने फोन केला होता. त्या फोनवर रडत होत्या. पारसचे वडील लिफ्टमध्ये अचानक चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु पारस पोहोचण्यापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. अनुपमा मालिकेती क्रू मेंबर्स आणि काही कलाकार हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.

काही दिवसांपूर्वी पारसला करोनाचा संसर्ग झाला होता. करोनावर मात केल्यानंतर त्याने पुन्हा मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात केली. पारसने वडिलांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. पण नंतर त्यांची देखील करोना चाचणी निगेटीव्ह आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:01 pm

Web Title: anupamaa actor paras kalnawat father dies of massive heart attack avb 95
Next Stories
1 …म्हणून वयाची ४० उलटल्यानंतरही अक्षय खन्ना अविवाहित
2 होळीच्या पुजेत संजना होणार सामिल? ‘आई कुठे काय करते’मध्ये वेगळे वळण
3 ‘दीदी तेरा दादू दीवाना’, क्रितीच्या बोल्ड फोटोवर कमेंट केल्यामुळे अमिताभ बच्चन झाले ट्रोल
Just Now!
X