News Flash

रणबीर- कतरिनाची हेरगिरी नक्की कशासाठी?

..यांची हेरगिरी उत्कंठा वाढवत आहे

अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चर्चा काही प्रमाणात कमी होत असतानाच रणबीर- कतरिनाच्या फोटोने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘जग्गा जासूस’ या आगामी चित्रपटातील हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून, यामध्ये रणबीर आणि कतरिना काहीतरी शोधण्याच्या उद्देशाने निघाले असल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो ना होतो तोच चित्रपटाचा आणखी एक ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला.

‘युटिव्ही मोशन पिक्चर्स’च्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, पहिल्या ट्रेलरमधील बरीच दृश्यं या ट्रेलरमध्येसुद्धा पाहायला मिळत आहेत. फक्त एकच संवाद असलेल्या या ट्रेलरमध्ये पार्श्वसंगीताची किमया अनुभवायला मिळते. संवादांशिवायही रणबीर- कतरिनाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनेकांचीच मनं जिंकत असल्याचं दिसतं. या चित्रपटात रणबीर आणि कॅटचा लूकही पाहण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे रणबीरची हेअरस्टाइल आणि त्याचा अभिनय पाहता चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. आपल्यातील लहानपण जागे करणारा आणि उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर सोशल मीडियावरही अनेकांचीच दाद मिळवत आहे.

वाचा: आजही दीपिकाचा टॅटू तिच्या पाठीशीच

2-jagga-jasoos

‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या नावावरुन अनेकांना रणबीर कोणत्यातरी धीट हेराच्या रुपात धाडसी कृत्ये करताना दिसेल, अशा अपेक्षा होत्या. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीरच्या भूमिकेतून एक वेगळ्याच रुपातील निरागस हेर पाहायला मिळतोय. काही थरारक दृश्यंसुद्धा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनुराग बासू आणि रणबीर कपूर यांच्या निर्मितीत साकारलेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर जात होती. पण, सरतेशेवटी १४ जुलै रोजी रणबीर- कतरिनाच्या रुपातील बॉलिवूडचं हे सुपरक्यूट हेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

वाचा: रणबीरची वरात लंडनच्या घरात?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:39 pm

Web Title: anurag basu directed movie jagga jasoos trailer poster ranbir kapoor katrina kaif disney adventure
Next Stories
1 अबब! ‘बाहुबली २’ने हेही साध्य केलं…
2 Tubelight: … म्हणून सोहेल ठरतोय ‘ट्युबलाइट’मधील मुख्य आकर्षण
3 सुपरस्टार रजनीकांतच्या ‘काला करिकालन’चं पोस्टर पाहिलं का?