दिग्दर्शक अनुराग बसूने राष्ट्रीय पुरस्कार विजेता बंगाली चित्रपट ‘शाब्दो’चे अधिकार विकत घेतले आहेत. ‘बर्फी’ दिग्दर्शक बसू हा कौशिक गांगुलीच्या ध्वनी रेकॉर्डिंग तज्ज्ञ कलाकारांवर आधारित असलेल्या ‘शाब्दो’चा रिमेक करणार आहे. या चित्रपटात रित्वीक चक्रोबोर्ती, रायमा सेन, चुर्नी गांगुली, विक्टर बॅनर्जी आणि श्रीजीत मुखर्जी यांनी भूमिका केल्या होत्या.
‘शाब्दो’च्या हिंदी रिमेकची अनुराग निर्मिती आणि दिग्दर्शनही करणार असून कौशिक त्याला चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये सहकार्य करणार आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम चालू असून याचे चित्रिकरण डिसेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.