“प्रत्येक कलाकाराकडे सामाजिक भान असावे. त्याने कुणालाही न घाबरता समाजिक मुद्द्यावर व्यक्त व्हावे” असे मत दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या एका आंतराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवात प्रेक्षकांना संबोधित करताना अनुरागने सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन काही बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला.

काय म्हणाला अनुराग?

“सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात खूप मोठ्या प्रमाणावर वाद विवाद घडले. अनेकांनी या अन्यायकारक कायद्याचा निषेध केला. काहींनी आदोंलने केली. परंतु बॉलिवूडमधील काही मान्यवर कलाकार मात्र शांत राहिले. प्रत्येक कलाकाराकडे सामाजिक भान असावे. आणि त्याने कुणालाही न घाबरता समाजिक मुद्द्यावर व्यक्त व्हावे. अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र शांत राहून मजा पाहाणारे हे कलाकार अगदीच भित्रट आहेत. त्यांना कदाचित पुन्हा काम मिळणार नाही. त्यांचे चित्रपट आपटतील. त्यांना ट्रोल केले जाईल याची भिती वाटते. अशा कलाकारांना पाहून त्यांच्या सामाजिक जाणिवा मेल्या आहेत का? अशी शंका येते.” असे म्हणत अनुराग कश्यपने सुधारित नागरिकत्व कायद्यावर कुठलेही मत व्यक्त न करणाऱ्या कलाकारांवर टीका केली.