News Flash

Video: मुलीने ‘सेक्स’ आणि ‘प्रेग्नंसी’वरून प्रश्न विचारल्यानंतर पिता अनुराग कश्यप म्हणाला…

या व्हिडीओमध्ये मुलगी आलिया कश्यप हिने वडील अनुराग कश्यपला असे प्रश्न विचारलेत जे सहसा अनेक तरूण मुलं-मुली आपल्या पालकांना विचारू शकत नाहीत.

(Photo: Aaliyah Kashyap/IYouTube)

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असलेली स्टारकिड आहे. आलिया कश्यप हिचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. फादर्स डेच्या निमित्ताने तिनं यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती वडील अनुराग कश्यपला काही खाजगी प्रश्न विचारताना दिसून येतेय. मात्र या व्हिडीओमधून या बाप-लेकींमध्ये असलेली स्ट्रॉंग बॉण्डिंग दिसून आली.

या व्हिडीओमध्ये मुलगी आलिया कश्यप हिने वडील अनुराग कश्यपला असे प्रश्न विचारलेत जे सहसा अनेक तरूण मुलं-मुली आपल्या पालकांना विचारू शकत नाहीत. या व्हिडीओमध्ये आलिया कश्यपने वडील अनुराग कश्यपला विचारलं, “जर मी प्रेग्नंट झाले आणि तुमच्याकडे येऊन मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर तुमची यावर काय प्रतिक्रिया असेल ?” मुलीच्या या विचित्र प्रश्नावर अनुराग कश्यपने उत्तर दिलं. यावेळी अनुराग कश्यप म्हणाला, “मी यावर विचार करेल, तुला विचारेल की तुला काय हवंय, यावर तुझा जो काही निर्णय असेल, तुला जे काही करायचं असेल त्यात मी तुझ्या निर्णयासोबत असेल….आणि हे तुला माहित आहे.”

बॉयफ्रेंडबद्दल विचारला प्रश्न

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सध्या शेन जॉर्जला डेट करतेय. वडीलांशी गप्पा मारताना तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सुद्धा एक प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना शेन पसंत असल्याचं अनुराग कश्यपने सांगितलं.

या व्हिडीओमध्ये अनुराग कश्यप आणखी म्हणतो, “मला तुझ्या मित्र-मैत्रिणीसाठीची आणि विशेष करून मुलांसाठीच्या तुझ्या पसंतीवर खूप विश्वास आहे. शेन खूप चांगला मुलगा आहे. तो खूप आध्यात्मिक आहे. खूप शांत आहे. जे एका ४० वर्षीय पुरूषांमध्ये सुद्धा गुण नसतील असे सगळे गुण त्याच्यामध्ये दिसून येतात. अचडणीचे अनेक प्रसंग तो व्यवस्थित मार्गी लावतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

 

तुझा जो काही निर्णय असेल त्यात मी तुझ्यासोबत असेल

वडील अनुराग कश्यपने दिलेलं हे उत्तर ऐकून आलिया कश्यप पुढचा आणखी एक प्रश्न विचारते. “तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा ठेवता…आणखी काय सांगाल…?” यावर उत्तर देताना अनुराग कश्यप म्हणतो, “तुझी पसंत काय आहे यावर माझा निर्णय असेल, मी याचा स्विकार करेल किंवा नाही याबद्दल…पण मी तुला आवर्जून हे सांगेल की यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागणार…पण तरीही तुझा जो काही निर्णय असेल त्या निर्णयात मी तुझ्यासोबत असेल.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 8:38 pm

Web Title: anurag kashyap answers daughter aaliyahs awkward questions on premarital sex her choice of boyfriends prp 93
Next Stories
1 कृतिका गायकवाडचे मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त फोटोशूट!
2 अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’मधल्या को-स्टारला पाहिलंत का? बिग बी म्हणाले, “परफेक्ट को-स्टार”
3 ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट अक्षयने केला बहिणीला समर्पित
Just Now!
X