05 June 2020

News Flash

…तर आपल्याला थाळ्याच वाजवत बसावं लागेल; अनुराग व्यक्त केली भीती

"डॉक्टर तंदुरुस्त असण गरजेच, अन्यथा..."

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी देखील आहेत. अशा प्रतिकूल परिस्थित जर डॉक्टरांना देखील करोनाची लागण झाली तर आपल्या देशाचं काही खरं नाही. अशी भीती बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केली आहे.

काय म्हणाला अनुराग?

“देशवासीयांना करोना विषाणूपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्व आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. ही सर्व माणसं तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे. जर त्यांना काही झालं तर, कितीही थाळ्या वाजवा किंवा दिवे पेटवा, आपलं काही खरं नाही.” अशा आशयाचं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो नेहमीच आपली मतं बिनधास्तपणे मांडताना दिसतो. देशभरात सध्या करोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. या पार्श्वभूमीवर अनुरागने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 4:12 pm

Web Title: anurag kashyap comment on coronavirus in india mppg 94
Next Stories
1 ‘या’ कारणासाठी अमृताने केला होता नवऱ्याचा नंबर ब्लॉक
2 Video : क्वारंटाइनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी ‘महागुरुं’ची कसरत
3 Ek thi begum : ‘उस बादशाह को मात ये बेगम देगी’; ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X