X
Advertisement

अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेण्ड सोबत शेअर केला फोटो, नेटकऱ्यांनी केली थट्टा

सोशल मीडियावर आलियाची चर्चा

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे ती कायम चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आलिया तिच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलीय.

सध्या आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आलियाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केलाय. या फोटोत ती तिचा कथित बॉयफ्रेण्ड शेन ग्रीगोइरे सोबत पोझ देताना दिसतेय. हा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “तुझ्यासोबत सर्वात जास्त आनंदी” असं म्हणत तिने याच एक हार्टचं इमोजी दिलंय.

आलियाने शेअर केलेल्या फोटोत ती बॉयफ्रेण्ड शेनच्या मिठीत दिसतेय. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलियाचा हॉट लूक पाहायला मिळतोय. आलियाच्या या फोटोवर दोघांची जोडी मस्त दिसत असल्याच्या कमेंट तिच्या अनेक मित्र मैत्रिणींनी केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र आलियाला ट्रोल केलंय.

आलियाच्या या फोटोवर अनेकांनी हा कोण? असाही सवाल केलाय. तर एक युजर म्हणाला, ” तो इतका गरीब का दिसतोय?” तर दुसरा युजर म्हणालाय “लंगूर के हात मे अंगूर”

(photo-instagram@ AaliyahKashyap)

एक नेटकरी आलियाच्या फोटो वर कमेंट करत “बापावर गेलीय” असं म्हणाला आहे. आलिया ही अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. २००९ सालात अनुराग आणि आरती विभक्त झाले. अनुराग अनेकदा मुलीसोबत वेळ घालवताना दिसतो.

23
READ IN APP
X