News Flash

Emmy Awards 2019 : सेक्रेड गेम्स आणि लस्ट स्टोरीजला सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन

एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकीत पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

यंदाच्या इंटरनॅशनल एमी पुरस्कारांवर भारतीय कलाकारांचे वर्चस्व दिसत आहे. नुकतीच या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यांत नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय मालिका सेक्रेड गेम्स आणि लस्ट स्टोरीज यांना बेस्ट ड्रामा व बेस्ट मिनी सीरीज या विभागांत नामांकन मिळाले आहे. तसेच अभिनेत्री राधिका आपटे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात नामांकन मिळाले आहे.

एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकीत पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकाराचे जगभरातून कौतूक केले जाते. या पार्श्वभूमिवर विचार करता भारतीय मालिकांना एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळणे नक्कीच कौतुकास्पद आहे. या पुरस्कार स्पर्धेत एकूण २१ देशांमधील ४४ मालिकांना नामांकन मिळाले आहे. न्यूयॉर्कमध्ये येत्या २५ नोव्हेंबर रोजी एमी पुरस्कार सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात विजेत्यांची घोषणा केली जाईल.

बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग कश्यपने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सर्व नामांकित कलाकारांचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 7:37 pm

Web Title: anurag kashyap international emmy awards sacred games lust stories netflix mppg 94
Next Stories
1 दीपवीरच्या IIFA लूकवर मीम्सचा पाऊस
2 …म्हणून सचिन धकाते यांनी केली वडिलांसाठी चित्रपटाची निर्मिती
3 कतरिनाची हीरोपंती, वाचवला कॅमेरामॅनचा जीव