News Flash

“मणिकर्णिका, जा चीनवर हल्ला कर; तुझ्या घरापासून ‘एलएसी’वर जायला एकच दिवस लागतो”

क्षत्रिय असल्याच्या ट्विटला दिलं उत्तर

संग्रहित

वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या अभिनेत्री कंगना रणौतवरील टीकेचा सूर अजूनही कमी झालेला नाही. कंगना सातत्यानं कुणालातरी लक्ष करणारे ट्विट करत असून, त्यावरून तिच्यावर टीका केली जात आहे. कंगनानं क्षत्रिय असल्याचं ट्विट केलं होतं. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपनं सुनावलं आहे.

कंगनानं क्षत्रिय असल्याबाबत ट्विट केलं होतं. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपनं कंगनाला चीनविरोधात लढाई करण्याचा सल्ला दिला आहे. “ताई तू एकटीच आहे, एकटीच मणिकर्णिका. तू चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर. बघ किती आतमध्ये घुसले आहेत. त्यांनाही दाखवून दे की, तू आहेस तोपर्यंत कुणीही देशाच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुझ्या घरापासून एक दिवसाच्या अंतरावर आहे एलएसी. जा वाघिणी. जय हिंद,” असा टोला अनुरागनं लगावला आहे.

कंगनानं काय केलं होतं ट्विट?

“मी एक क्षत्रिय आहे. एकवेळ शिर कापलं तरी चालेल, पण झुकवणार नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहिन. मान, सन्मान व स्वाभिमानानं जगले आहे आणि गर्वानं राष्ट्रवादी म्हणून जगत राहिल. सिद्धांतासोबत कधीच तडजोड केलेली नाही, करणार नाही. जय हिंद,” असं ट्विट कंगनानं केलं होतं. कंगनाच्या याच ट्विटवरून अनुराग कश्यपनं तिला चीनवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 3:36 pm

Web Title: anurag kashyap kangana ranaut bollywood bmh 90
Next Stories
1 “…तर मी ट्विटर कायमचं सोडेन”; कंगना रणौतनं दिलं आव्हान
2 ‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
3 प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू
Just Now!
X