25 February 2021

News Flash

२२ वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडला अनुराग कश्यप

अनुरागने सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेमाची कबूली दिली आहे

प्रेमात पडायला वयाचे आणि वेळेचे बंधन नसते असे आपण बऱ्याच वेळा ऐकतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकरांना हे लागूही झाले आहे. बॉलिवूड अभिनेता, मॉडेल मिंलिंद सोमण, अभिनेता अर्जुन कपूर अशा अनेक कलाकारांनंतर आता बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतही असेच काहीसे झाले आहे. अनुरागच्या बॉलिवूडमधील करिअरसोबतच खासगी आयुष्याच्या चर्चादेखील रंगल्या आहेत. आज १० सप्टेंबर रोजी अनुराग त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी आपण जाणून घेऊया त्याच्या लव्ह लाईफ बद्दल…

अनुराग त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या खाजगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अनुरागने दोन वेळेस लग्न केले आणि घटस्फोट सुद्धा घेतला. मात्र घटस्फोटानंतरही त्या दोघींशी अनुरागची मैत्री कायम आहे. सध्या अनुराग त्याच्या पेक्षा २२ वर्षांनी लहान मुलीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ही मुलगी अनुरागच्या ‘फॅन्टम’ कंपनीमध्ये काम करत असल्याचे म्हटले जात आहे. अनुरागने पहिले हे नाते गुपित ठेवले होते. पण आता खुद्द अनुरागे सोशल मीडियाच्या माध्यमातून नात्याची कबूली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

Love

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

आणखी वाचा : …म्हणून अनुराग कश्यपला ‘तेरे नाम’मधून काढून टाकण्यात आले

सध्या अनुराग त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षांच्या मुलीला डेट करत आहे. तिचे नाव शुभ्रा शेट्टी असे आहे. एका मुलाखतीदरम्यान अनुरागला त्याच्या अफेअर बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. ‘सर्वांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. मी प्रेमाचा खूप आदर करतो. मग ते वयाच्या ९०व्या वर्षी झालेलं असो वा आणखी कधी. मी दु:खी मनाने एकटा जागू शकत नाही’ असे त्याने म्हटले.

आणखी वाचा : अखेर ११ महिने ११ दिवसांनंतर ऋषी कपूर परतले मायदेशी

अनुरागने २००३मध्ये आरती बजाजशी लग्न केले होते. मात्र त्या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर २००९मध्ये त्यांनी विभक्त होण्याच निर्णय घेतला. त्यानंतर अनुरागचे अभिनेत्री कल्की कोचीनसोबत सूत जुळले आणि २०११मध्ये ते लग्नबंधनात अडकले. मात्र अनुरागचा हा संसारही फार काळ टिकला नाही. अखेर २०१५मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता अनुराग त्याच्या पेक्षा २२ वर्षांनी लहान शुभ्रा शेट्टीला डेट करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:07 pm

Web Title: anurag kashyap love life anurag kashyap love affairs avb 95
Next Stories
1 अखेर ११ महिने ११ दिवसांनंतर ऋषी कपूर परतले मायदेशी
2 ‘बेस्ट विलन का अवॉर्ड तो मुझे ही मिलेगा’; पाहा झायरा वसीमच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर
3 …म्हणून अनुराग कश्यपला ‘तेरे नाम’मधून काढून टाकण्यात आले
Just Now!
X