09 April 2020

News Flash

“मोदी रात्री आठ वाजताच घोषणा का करतात?”

अनुराग कश्यपने केला मोदींना सवाल

“मोदी दर वेळी रात्री आठ वाजताच घोषणा का करतात? सकाळी सांगू शकत नाही का?” असं म्हणत बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने देशातील लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशभरातील लोक सध्या करोना व्हायरसमुळे त्रस्त आहेत. करोनामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशामध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पुढील २१ दिवस देशात लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. मात्र या लॉकडाऊनवर अनुराग कश्यप याने उपरोधिक टोला लगावला आहे.

काय म्हणाला अनुराग कश्यप?
“मोदी दर वेळी रात्री आठ वाजताच घोषणा का करतात? त्या ऐवजी चार वाजता घोषणा करावी. प्रत्येक वेळी आठ वाजता बोलतात आणि लोकांना केवळ चार तासांचा वेळ देतात. अशा लोकांचे काय जे चालत घरी जाणार आहेत? आता बोलू तर काय बोलू, ठिक आहे प्रभू.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुरागने मोदींच्या लॉकडाऊनच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अनुराग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसतो. या पार्श्वभूमीवर त्याने लॉकडाऊनवर केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 9:42 am

Web Title: anurag kashyap narendra modi coronavirus lockdown announcement mppg 94
Next Stories
1 Video : करोनामुळे घरात बसलेले सेलिब्रिटी काय करत आहेत?
2 करिना-तैमूरच्या फोटोवर हिंदू मुस्लीम कमेंट करणाऱ्यावर भडकला अर्जून कपूर, म्हणाला तू कोण….
3 ‘नेहमी आठ वाजता बोलतात आणि तयारीसाठी चार तासांचा वेळ देतात’; अनुराग कश्यपचा मोदींना टोला
Just Now!
X