News Flash

“वादा तेरा वादा…”; भाजपाच्या फ्री वॅक्सिन आश्वासनाची अनुराग कश्यपने उडवली खिल्ली

भाजपाचा जाहीरनामा : …तर बिहारच्या जनतेला करोना लस मोफत देऊ

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यामधील एक आश्वासन सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाची लस मोफत देण्यात येईल, असं आश्वासन भाजपाने दिलं आहे. त्यांच्या या आश्वासनावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने प्रतिक्रिया दिली. त्याने राजेश खन्ना यांच्या ‘दुश्मन’ चित्रपटातील ‘वादा तेरा वादा’ या गाण्याचा व्हिडाओ ट्विट करुन भाजपावर उपरोधिक टोला लगावला आहे. बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘भाजपाला मत द्या अन्यथा लस मिळणार नाही?’; भाजपाच्या जाहिरनाम्यावर दिग्दर्शकाचा सवाल

बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.

अवश्य पाहा – ‘घरात १० दिवस बंद राहून पाहा मग कळेल’; ‘बिग बॉस’ स्पर्धक ट्रोलर्सवर संतापली

काय काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात

१) करोनाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार

२) मेडिकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार

३) ३ लाख शिक्षकांची भरती करणार

४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार

५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार

६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार

७) दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची उभारणी

८) धान्य आणि गहूसोबत सरकार डाळीही विकत घेणार

९) २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार

१०) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात राज्य पहिल्या क्रमांकावर आणणार

११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 7:23 pm

Web Title: anurag kashyap on bjp manifesto bihar election 2020 mppg 94
Next Stories
1 शिल्पा शेट्टीने शेअर केली तिची सिक्रेट रेसिपी; फिट राहण्यासाठी आहारात करते ‘या’ पदार्थाचा समावेश
2 ‘रेहना है तेरे दिल में’मधील ही जागा मुंबईमध्ये कुठे आहे?, १९ वर्षांनंतर आर माधवनचा खुलासा
3 “अश्लिलता पसरवणं थांबवा”; इरॉसच्या नवरात्री शुभेच्छांवर कंगना संतापली
Just Now!
X