डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मीडियावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. मग तो डॅशिंग डॉन देवा म्हणजेच देवदत्त नागे असो समंजस आणि कडक शिस्तीच्या डॉ. मोनिका म्हणजेच श्वेता शिंदे असो किंवा मालिकेमधले तरुण चेहरे कबीर आणि राधा म्हणजेच अभिनेता अनुराग वरळीकर किंवा प्रज्ञा चवांडे असो. या कलाकारांचा चाहतावर्ग सध्या चांगलाच वाढताना दिसतोय.

कबीर म्हणजे डॉ मोनिका यांचा मुलगा त्यांच्याच सारखा शिस्तीत वाढलेला, समंजस आणि प्रामाणिक आहे. यामुळे सध्या अनेक तरुण तरुणी कबीरचे चाहते बनलेत. कबीर साकारणारा अनुराग चाहत्यांच्या या प्रेमाने चांगलाच भारावून गेलाय. आणि यानिमित्तानं कबीर आणि अनुराग यांच्यातल्या साम्य भेदाबद्दल मत मांडतोय.

star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Majhya Navaryachi Bayko fame actor mihir Rajda played Bhakt Pralhad and Young Sudama in TV Serial Shri Krishna of Ramanand Sagar
रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेतील चिमुकल्याला ओळखलंत का? मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून केलंय काम

अनुरागच्या मते कबीर आणि त्याच्या स्वतःमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत तर काही वेगळ्या आहेत, ते सांगताना अनुराग म्हणाला, “कबीर हा खुप शिस्तीने वागणारा आहे म्हणजे त्याचे प्रत्येक दिवसाचे टाईमटेबल ठरलेले असते आणि तो ते काटेकोरपणे पाळतो. तसंच माझं पण आहे मला पण प्रत्येक्ष आयुष्यामध्ये माझं टाईमटेबल नियमितपणे पाळायला आवडतं आणि मी ते पाळतोही. याउलट मालिकेमधला कबीर खुपच सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक दाखवलाय तो नियम पाळतो त्या नियमानुसार जगतो, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मी तसा बिलकूल नाही आहे. मला धमाल मस्तीमध्ये जगायला आवडतं. शुट करतानाही मी खुप मस्ती करत असतो मला इतकं शांत आणि निरसपणे जगायला नाही आवडत.”