20 September 2018

News Flash

अन् अनुष्काने घातला विराटचाच टी-शर्ट!

अनुष्काने निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचे टी- शर्ट घातले होते

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

जेव्हा आवडत्या सेलिब्रिटी कपल्सबद्दल बोलले जाते तेव्हा त्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नावाचा उल्लेख सर्वातआधी केला जातो. सध्या अनुष्का तिच्या आगामी ‘सुई धागा’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या मध्यप्रदेशमध्ये सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी चित्रीकरणातून थोडासा वेळ काढत ती विराटला भेटण्यासाठी मुंबईला आली होती. विराटला भेटून ती पुन्हा सिनेमाच्या पुढील चित्रीकरणासाठी मध्य प्रदेशला गेली. मध्य प्रदेशला जातानाचे तिचे विमानतळावरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

HOT DEALS
  • I Kall K3 Golden 4G Android Mobile Smartphone Free accessories
    ₹ 3999 MRP ₹ 5999 -33%
  • Vivo V5s 64 GB Matte Black
    ₹ 13099 MRP ₹ 18990 -31%
    ₹1310 Cashback

अनुष्काने निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचे टी- शर्ट घातले होते. यावेळी अनुष्काच्या टी-शर्टकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. अनुष्काने जे टी-शर्ट घातले होते तसेच टी-शर्ट विराटकडेही आहे. त्यामुळे अनुष्काने विराटचेच टी-शर्ट तर घातले नाही ना असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. आता अनुष्का आणि विराटची पांढऱ्या टी- शर्टचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विरुष्काच्या या टी-शर्टवर ‘स्टेट ऑफ माइंड’ असे लिहिले आहे. अनुष्का आणि विराट सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने विराटला किस करताना आणि विराट सेल्फी घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

View this post on Instagram

💑

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ती वरुण धवनसोबत ‘सुई धागा’ सिनेमात दिसणार आहे. नुकताच तिचा ‘परी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळाला. या दोन सिनेमांशिवाय ती आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ सिनेमात ती शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

First Published on March 13, 2018 7:05 pm

Web Title: anushka sharma and virat kohli wore same tshirt to the airport