07 March 2021

News Flash

भूमी पेडणेकर होणार शुद्ध शाकाहारी; अनुष्कानेही केलं कौतुक, म्हणाली…

...म्हणून भूमीने घेतली पूर्णत: शाकाहारी होण्याची शपथ

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क शाकाहारी आहारामुळे चर्चेत आहे. होय, भूमीने आता यापूढे कधीही मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती आता पूर्णत: शुद्ध शाकाहारी झाली आहे.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

भूमीने एका इन्स्टापोस्टच्या माध्यमातून शाकाहारी होण्याचं कारण सांगितलं. “आता यापुढे कधीही मी मांसाहारी पदार्थांचं सेवन करणार नाही. खर तर गेल्या अनेक वर्षांपासून मी पूर्णत: शाकाहारी होण्याचे प्रयत्न करत होते. पण सवयीवर नियंत्रण मिळवणं खूप कठीण असतं. तसं पाहिलं तर मांसाहार खाण्यासाठी मी फारशी उत्साही नसते पण लॉकडाउनमुळे आता आता मला शाकाहाराची सवयच झाली. गेले ६ महिने मी मांसाहारी पदार्थांचं सेवन केलेलं नाही.” अशा आशयाची पोस्ट भूमीने केली आहे.

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

 

View this post on Instagram

 

#FoodForThought

A post shared by Bhumi (@bhumipednekar) on

भूमी पेडणेकरने घेतलेला हा नवा निर्णय सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. काही महिन्यांपूर्वी अनुष्काने देखील पूर्णत: शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर तुझं शाकाहारी क्लब मध्ये स्वागत आहे असं म्हणत तिच्या निर्णयावर अनुष्काने आनंद व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 5:29 pm

Web Title: anushka sharma bhumi pednekar vegetarian club mppg 94
Next Stories
1 देवा आणि डॉ मोनिकाच्या प्रेमाला होतोय आक्काचा विरोध…
2 “आणखी वाट पाहू शकत नाही,”; हा नवा चित्रपट पाहण्यासाठी आमिर झाला उतावळा
3 “मला अस्थमा आहे आणि निकला…”: करोनासंदर्भातील प्रश्नावर प्रियांकाचे उत्तर
Just Now!
X