X
X

अनुष्काने पोस्ट केला बिकिनीतला ‘हॉट’ फोटो, विराट म्हणतो…

या फोटोवर आलेल्या कमेंटपैकी विराटची कमेंट खास ठरत आहे

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ही ‘हॉट अँड फिट’ जोडी कायम चर्चेत असते. विराट कोहली ज्यावेळी मैदानावर फटकेबाजी करत असतो, तेव्हा बहुतेक वेळी अनुष्का स्टेडिअममध्ये असते. आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती कायम सज्ज असते. सध्या आपल्या शूटिंग आणि व्यस्त वेळापत्रकातून तिने सुटी घेतली असून ती भारताच्या संघाबरोबर विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ती विराटसोबत वेळ घालवत आहे आणि विंडिजच्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटत आहे. याच ठिकाणच्या एका फोटोमुळे सध्या विरूष्का जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.

भारतीय संघ काही दिवसांपूर्वी विंडिजमधील एका ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटताना दिसला. रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन हे खेळाडू मजा करताना दिसून आले. त्यात विराट कोहली दिसला नव्हता. पण विराटची पत्नी अनुष्का हिने मात्र विंडिज बेटांवर समुद्राच्या पाण्याचा आनंद लुटला. तिने तिचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिने बिकिनी घातली आहे आणि ती समुद्र किनाऱ्यावर वाळूत बसून फोटोसाठी पोझ देत आहे.

 

View this post on Instagram

 

Sun kissed & blessed

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काच्या या ‘हॉट’ फोटोवर सर्व चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. पण या सर्व कमेंटमध्ये विराटची कमेंट सर्वात खास ठरली. विराटने तिच्या फोटोवर शब्दांनी व्यक्त न होता इमोजी टाकून आपले प्रेम आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विंडिजविरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. सध्या विंडिज अ संघाशी भारताचा सराव सामना सुरू आहे. या सामन्यासाठी विराटने विश्रांती घेतली आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत तो खेळणार आहे.

24
X