News Flash

वधूच्या वेशात अनुष्का!

विराटच्या खेळीसाठी अनुष्काची सोशल मिडियावर बरीच खिल्ली उडवली जाते.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या तिच्या कामापेक्षा भारतीय खेळाडू विराट कोहलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल अधिक चर्चेत आहे. विराट कोहलीच्या चांगल्या आणि वाईट खेळीसाठी अनुष्कालाच कारणीभूत मानून तिची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली जातेय. पण, याकडे लक्ष न देता अनुष्का तिच्या कामात व्यस्त झाली आहे.
सध्या अनुष्का करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी राजस्थानला पोहचली आहे. या चित्रपटामध्ये एक विवाह दृश्य असून त्यात अनुष्का नवरीच्या पोशाखात दिसणार असल्याचे वृत्त मिड डेने दिले आहे. अनुष्का आणि रणबीर कपूर व्यतिरीक्त या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2016 9:26 am

Web Title: anushka sharma dresses up as a bride
टॅग : Anushka Sharma
Next Stories
1 ‘कटय़ार’ व ‘नटसम्राट’नंतर आता ‘ती फुलराणी’ रुपेरी पडद्यावर!
2 फवाद खान ६१ वर्षीय संगीतकाराच्या भूमिकेत
3 शाहिद कपूरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार?
Just Now!
X