21 September 2018

News Flash

मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा

अशा प्रकारचा बोलका पुतळा सिंगापूरच्या संग्रहालयात असणारी अनुष्का ही भारतातील पहिली सेलिब्रिटी आहे.

अनुष्का शर्मा

मादाम तुसाँ संग्रहालयातील बॉलिवूड विभाग जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. या विभागात कोणत्या बॉलिवूड कलाकाराची वर्णी लागणार याबद्दल लोकांना उत्सुकता असतेच पण, कलाकारही त्या संधीची वाट पहात असतात. सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयात अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा पुतळा चाहत्यांसोबत गप्पाही मारणार आहे. तुम्हीही झालात ना थक्क? अनुष्काचा हा पुतळा बोलका असणार आहे आणि अशा प्रकारचा पुतळा सिंगापूरच्या संग्रहालयात असणारी अनुष्का ही भारतातील पहिली सेलिब्रिटी आहे.

HOT DEALS
  • Lenovo K8 Note Venom Black 4GB
    ₹ 11250 MRP ₹ 14999 -25%
    ₹1688 Cashback
  • Nokia 1 | Blue | 8GB
    ₹ 5199 MRP ₹ 5818 -11%
    ₹624 Cashback

मादाम तुसाँ संग्रहालयात मोजक्याच लोकांच्या पुतळ्यावर इंटरॅक्टिव्ह फीचरचा प्रयोग केला जातो. फुटबॉलपटू रोनाल्डो, ओपरा विन्फ्रे आणि लुईस हॅमिल्टन यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत आता अनुष्का शर्माचा बोलका मेणाचा पुतळा या संग्रहालयात असणार आहे.

वाचा : ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख या सह-कलाकाराला करतेय डेट?

अनुष्काच्या या पुतळ्यासोबत चाहते सेल्फीसुद्धा काढू शकणार आहेत. अनुष्काच्या हातात फोन असलेला हा पुतळा असून जेव्हा तो फोन उचलला जाणार तेव्हा तिचा आवाज ऐकू येणार आहे. या संग्रहालयाची टीम लवकरच पुतळ्यासाठी मोजमाप घेणे, पोज ठरवणे अशा तांत्रिक गोष्टी टिपून घेण्यासाठी अनुष्काशी संपर्क साधणार आहे.

First Published on July 11, 2018 6:27 pm

Web Title: anushka sharma gets a talking statue at madame tussauds singapore first indian to get the honour