बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या नव्या पाहुण्याची वाट पाहत आहेत. अनुष्का शर्मासोबत वेळ घालवता यावा यासाठी विराटने सुट्टी घेतली असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतला आहे. अनुष्का आणि विराट अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत. मात्र यावेळी फोटोग्राफर्सकडून होणारा पाठलाग अनुष्का शर्मासाठी संतापजनक ठरत आहे.
अनुष्का शर्माने आपण वारंवार सांगूनही आपला आणि विराटचा फोटो काढल्याने संताप व्यक्त केला आहे. अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत फोटोग्राफर आणि संस्थेला आमच्या प्रायव्हसीमध्ये डोकाऊ नका असं म्हटलं आहे.
आणखी वाचा- गरोदरपणातही ‘फिटनेस फर्स्ट’! शिर्षासनानंतर अनुष्काचा ट्रे़डमीलवरचा Video व्हायरल
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच घराबाहेर पडले होते. यावेळी दोघं एकत्रित वेळ घालवत असतानाचे फोटो समोर आले होते. अनुष्का शर्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे एका बाल्कनीत बसलेले दिसत आहेत. कृपया हे थांबवा अशी विनंती तिने पोस्टमध्ये केली आहे.
दरम्यान अनुष्का प्रेग्नंट असतानाही काम करत असून अनेक ठिकाणी शुटिंग करताना दिसत आहे. याशिवाय सोशल मीडियावर अनेक पोस्टही शेअर करत आहे. नुकताच तिने व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला होता.
ऑगस्ट महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून घऱी नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 11:05 am