20 October 2020

News Flash

‘तो’ फोटो पाहून अनुष्का म्हणते…

विराटनं शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही सध्या बॉलिवूड आणि क्रिकेटवर्ल्डमधली सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. गेल्यावर्षीच या जोडप्यानं इटलीत विवाह केला होता. ही सर्वाधिक प्रसिद्ध जोडी नेहमीच या ना त्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच विराटनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्का आणि त्याचा फोटो शेअर केला. ज्यात एकमेकांना मिठी मारून प्रेमात आकंठ बुडालेलं हे जोडपं प्रेमाची ग्वाही देताना दिसत होतं. ‘मी आणि माझी एकमेव..’ असं कॅप्शन देऊन विराटनं हा फोटो शेअऱ केला होता.

हा फोटो पाहून अनुष्काही खुलली. ‘मलाही तूझी खूप आठवण येत आहे’ अशी कॉमेंट अनुष्कानं विराटचा तो फोटो पाहून दिली आहे. विशेष म्हणजे अनुष्कानं विराटचा हा फोटो आपला इन्स्टाग्राम डिपी म्हणूनही ठेवला. सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, तर अनुष्का ‘सुई धागा’ चित्रपटाच्या चित्रिकरणात आणि ‘परी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे नवीनच लग्न झालेल्या या जोडप्याला एकत्र वेळ घालवायला फार कमी संधी मिळत आहे.  असं असलं तरी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा विराट आणि अनुष्का फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात.

View this post on Instagram

My one and only! ♥️😇♥️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 5:02 pm

Web Title: anushka sharma give reply to virat kohali most adorable photos
Next Stories
1 सरकारी बसमध्ये ‘अय्यारी’चा फुकट शो, पायरसीपुढे दिग्दर्शक नीरज पांडे हतबल
2 VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?
3 दास्तान-ए-मधुबाला भाग ८
Just Now!
X