News Flash

अबब! ३५ किलोचा गाऊन

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष्य वेधण्यास सज्ज झाली आहे.

| July 11, 2014 12:47 pm

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष्य वेधण्यास सज्ज झाली आहे. अनुराग कश्यपच्या आगामी ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात ती जॅझ सिंगरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताचं ती निहारीका भसीन खानने डिझायन केलेल्या गाऊनमध्ये दिसली. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन.. तर निहारीकाने डिझायन केलेल्या या हिरव्या रंगाच्या सिक्वीन कोचर गाऊनचे वजन तब्बल ३५ किलो आहे. हा गाऊनमध्ये अनुष्कावर चित्रपटाच्या सुरुवातीचे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर, रवीना टंडन आणि करण जोहर यांच्याही भूमिका आहेत. बॉम्बे वेल्वेटची निर्मिती फॅन्टम फिल्मस आणि फॉक्स स्टार स्टुडिओ करणार असून अनुराग कश्यप याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाव्यतिरीक्त अनुष्का झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’, तिची स्वतःची निर्मिती असलेला ‘एनएच् १०’ आणि राजकुमार हिराणीच्या ‘पीके’ चित्रपटातही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 12:47 pm

Web Title: anushka sharma in 35 kg gown for bombay velvet
Next Stories
1 रितेश नव्हे ‘माऊली’!
2 डॉ. अमोल कोल्हे नृत्याविष्कारातून ‘भगव्या’चा इतिहास उलगडणार
3 चित्रनगरीः मराठीला तमिळ तडका…. ‘लय भारी’
Just Now!
X