News Flash

अनुष्का शर्माच्या ‘फिल्लौरी’चा लोगो

‘फिल्लौरी’ ही अशा मुलीची कथा आहे जिचे लग्न ठरले असून तिला मंगळ आहे.

(फिल्लौरी, अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज. छाया सौजन्य : गुगल)

‘एनएच १०’ सारखा जबरदस्त सिनेमा केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून बनणाऱ्या दुसऱ्या सिनेमाच्या तयारीलाही लागली आहे. तिच्या आगामी सिनेमाचे नाव ‘फिल्लौरी’ असे आहे. अनुष्काने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली होती. तिने सांगितले की, २४ मार्च २०१७ ही आहे ‘फिल्लौरी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख. आताच लिहून ठेवा.. खूप मजा येणार आहे. उडता पंजाब चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज यात अनुष्कासह मुख्य भूमिकेत दिसेल. आज अनुष्काने तिच्या या चित्रपटाचा लोगो सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केला आहे. ट्विटरवर चित्रपटाचा लोगो शेअर करत लवकरच फिल्लौरीचा ट्रेलर येईल असे अनुष्काने ट्विट केले आहे.

‘स्नॅपचॅट’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ अशा अनेक ठिकाणी सध्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या अभिनेता दिलजीत दोसांझच्या चाहत्यांचा आकडा अतिशय वेगाने वाढत आहे. ‘उडता पंजाब’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या चित्रपटातून पंजाब पोलिसात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत पंजाबी सुपरस्टार, अभिनेता दिलजीत दोसांजने हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. ‘पंजाब १९८४’, ‘जाट अॅन्ड ज्युलिअट’, ‘सरदारजी- भाग १, २’, ‘अम्बरसरिया’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांतून वेगळ्या धाटणीचा अभिनय सादर करत ‘देसी मुंडा’ दिलजीत त्याच्या ‘हार्ड कोर’ पंजाबी गायनशैलीनेही जगभरातील प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहे.

दरम्यान, अनुष्का शर्माच्या निर्मिती संस्थेअंतर्गत बनणाऱ्या ‘फिल्लौरी’ सिनेमाच्या कथेचा पहिला भाग काही दिवसांपूर्वीच लीक  झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ‘फिल्लौरी’ ही अशा मुलीची कथा आहे जिचे लग्न ठरले असून तिला मंगळ आहे. त्या मुलीवर असलेल्या मंगळाचा प्रभाव दूर करण्यासाठी तिचे लग्न आधी एका झाडाशी लावून नंतर मग मुलाशी केले जाते. खरं तर ही लीक झालेली कथा सिनेमाचा अगदी छोटासा भाग असल्याचे म्हटले जातेय. चित्रपटातील या प्रसंगाद्वारे समाजातील अंधविश्वास आणि चुकीच्या पद्धतीने चालत आलेल्या रुढी परंपरा दूर करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. यास फिल्मी तडका देण्यात येईल ते काही वेगळे सांगावयास नको. या सिनेमात अनुष्का शर्मा हिच्यासोबत ‘उडता पंजाब’ या सिनेमाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज आणि सूरज शर्मा यांच्याही मुख्य भूमिका असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 4:48 pm

Web Title: anushka sharma is back as a producer with phillauri shares the official logo of the film
Next Stories
1 गुरुदत्त यांच्या मृत्यूनंतर एकट्या पडल्या होत्या वहीदा रेहमान
2 VIDEO : जबरा फॅन आजीबाईंसाठी ‘रईस’ शाहरुख गुडघ्यावर बसतो तेव्हा..
3 ‘नकुशी’ने गाठला १०० भागांचा टप्पा
Just Now!
X