News Flash

“हा फोटो खास नाही, पण…; अनुष्कानं ‘व्हॅलेंटाईन’निमित्ताने पोस्ट केला विराटसोबतचा क्षण

पाहा फोटो

मातृत्वामुळे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सिनेसृष्टीपासून काही महिन्यांपासून लांब असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने अनुष्काने विराटसोबतचा एक रोमँटिक फोटो पोस्ट करत प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अनुष्काने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत अनुष्काने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि विराटने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. अनुष्का आणि विराट एकमेकांच्या डोळ्यात बघत आहेत. दोघे समुद्र किनाऱ्यावर असतानाचा हा फोटो असून त्या दोघांच्यामध्ये मावळता सुर्य दिसत आहे. “विशेष करून हा (फोटो काढलेला) दिवस खूप खास नाही, पण आजचा दिवस हा सूर्यास्ताचा फोटो पोस्ट करण्यासाठी खास असल्यासारखे वाटत आहे. माझा व्हॅलेंटाईन दररोज आणि त्यापेक्षाही पलीकडे,” अशा आशयाचे कॅप्शन अनुष्काने दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला विराट आणि अनुष्का सोबत नाहीत. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत सामना सुरू असल्याने अनुष्का आणि विराटसोबत नाही.अनुष्काने ११ जानेवारी रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. याची माहिती विराटने सोशल मीडिया पोस्ट द्वारे दिली होती. तर त्यांच्या मुलीचे नाव वामिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 7:28 pm

Web Title: anushka sharma post a romantic photo with hubby virat kohli on valentines day dcp 98
Next Stories
1 अर्जुन कपूरचा हटके व्हॅलेन्टाईन! १०० कर्करोगग्रस्त कपल्सना करणार मदत
2 अभिनय बेर्डे येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
3 Valentine’s Day Special: अनन्या पांडेने सांगितलं EX-Boxचं गुपित
Just Now!
X