News Flash

देख भाई देख! सलमान आलियाच्या पहिल्या ऑडिशनचे व्हिडीओ व्हायरल

VIDEO : 'या' ऑडिशनने सलमान खान आलिया भट्टला केलं सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये करिअर करणं हे देशातील जवळपास प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. काही जण त्या दिशेने प्रयत्न देखील करतात. परंतु फारच कमी लोकांना यामध्ये यश मिळतं. सलमान खान, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, आलिया भट्ट हे आज बॉलिवूडमधील सुपरस्टार कलाकार म्हणून ओळखले जातात. या मंडळींनी फिल्मी बॅकग्राउंडच्या जोरदावर बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली खरी, परंतु यांना देखील कधीकाळी इतर सर्वसामान्य कलाकारांप्रमाणे ऑडिशनच्या रांगेत उभे राहावे लागले आहे. या मंडळींच्या पहिल्या ऑडिशनचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर मग पाहूया तुमच्या आवडत्या कलाकारांचे पहिले ऑडिशन..

सलमान खान – हा व्हिडीओ १९८९चा आहे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या वेळी सलमानने असे ऑडिशन दिले होते.

आलिया भट्ट – हा व्हिडीओ २०१२चा आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या वेळी आलियाने असे ऑडिशन दिले होते.

रणवीर सिंग – हा व्हिडीओ कुठल्या चित्रपटाचा आहे याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही.

अनुष्का शर्मा – हा व्हिडीओ २००८चा आहे. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाच्या वेळी अनुष्काने असे ऑडिशन दिले होते.

क्रिती सेनॉन – हा व्हिडीओ कुठल्या चित्रपटाचा आहे याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही.

हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 5:59 pm

Web Title: anushka sharma ranveer singh alia bhatt and others gave auditions mppg 94
Next Stories
1 राखीने शेअर केला शाहरुखसोबतचा फेक फोटो, नेटकरी म्हणाले…
2 Viral Video: कमल हासन यांनी करोनावर तयार केलेलं गाणं ऐकलं का?
3 VIDEO : आईसाठी हा सुपरस्टार झाला शेफ; करतोय रोज नवनवीन पदार्थ