16 February 2019

News Flash

Sui Dhaga : सोशल मीडियावर मीम्स गाजल्यानंतर अनुष्काने रिक्रिएट केलं ‘ते’ दृश्य

अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे.

अनुष्का शर्मा

अभिनेता वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला सुई धागा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनुष्काने या चित्रपटात केलेल्या एका सीनची जोरदार चर्चा सुरु असून त्याचे अनेक मीम्स देखील तयार करण्यात आले होते.

‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून यातील अनुष्काचा एक सीन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्याचे काही मीम्स तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे अनुष्काने पहिल्यांदाच हा सीन रिक्रिएट करुन दाखविला आहे.

काही दिवसापूर्वी वरुण धवन आणि अनुष्काने इंडियन आयडलच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी तीने हा सीन रिक्रिएट केल्याचं पाहायला मिळालं.या कार्यक्रमात मनीष पॉलने अनुष्काला हा सीन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर करुन दाखविण्यास सांगितला.विशेष म्हणजे अनुष्कानेही अगदी हसतहसत हा सीन केला.
दरम्यान, अनुष्काचा हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून पहिल्यांदाच अनुष्का नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येणार आहे.

First Published on September 12, 2018 2:02 pm

Web Title: anushka sharma recreates the funny crying face meme from film sui dhaaga