21 April 2019

News Flash

..म्हणून अनुष्कामुळे रडली कतरिना

अनुष्काने मला रडवलं असं कतरिनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं.

कतरिना कैफ, अनुष्का शर्मा

शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘झीरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच सोशल मीडियावर त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील अनुष्काने मला रडवलं असं कतरिनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं.

‘झीरो’मध्ये अनुष्का एका अपंग वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. अनुष्काची ही भूमिका कतरिनाला खूप आवडली आणि त्यामुळे तिचं शूटिंग पाहण्यासाठी ती सेटवर नेहमीच उपस्थित असायची. अनुष्काचं स्वत:ला भूमिकेत झोकून देऊन काम करणं तिला भावलं आणि तिचं वास्तववादी अभिनय पाहून कतरिना सेटवर भावूक व्हायची. ‘अनुष्का इतकी सुंदर भूमिका साकारायची की ते पाहून मला रडू कोसळायचं. तिचं भूमिका जगणं मला खूप आवडतं, असं ती म्हणाली.

या चित्रपटात शाहरुख एका बुटक्या व्यक्तींची भूमिका साकारत आहे. वयाची ३० ओलांडली तरी बउआचं लग्न होत नाही अखेर त्याला मनासारखी जोडीदार अनुष्काच्या रुपानं मिळते. पण नियतीला ते मंजूर नसतं आणि अशाताच या बहुआची भेट सुपरस्टारशी म्हणजेच कतरिनाशी होते आणि त्याचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचतं साधरण या कथानकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. आनंद राय दिग्दर्शित ‘झीरो’ या चित्रपटात झीरोचा हिरोपर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

First Published on November 8, 2018 6:20 pm

Web Title: anushka sharma role in zero made me cry said katrina kaif