News Flash

‘माझ्या खाजगी आयुष्यावर कोणी चर्चा केली की….’, अनुष्काने वक्तव्य केला संताप

अनुष्काने मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काचे लाखो चाहते आहेत. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अनुष्काने जानेवारी महिन्यात वामिकाला जन्म दिला. मात्र, तिने आणि विराटने वामिकाला सोशल मीडिया आणि लाइमलाईट पासून लांब ठेवलं आहे. त्या दोघांनी वामिकाला लाइमलाईट पासून लांब ठेवायचं ठरवलं आहे. माझ्या रिलेशनशिप किंवा वामिका बद्दल लोक कॉफीवर चर्चा करतील हे मला आवडतं नाही, असे वक्तव्य अनुष्काने केले आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा सगळीकडे त्यांची चर्चा होत असे. त्यांनी त्यांच्या नात्या सोबत त्यांच्या लग्नालाही लाइमलाईट पासून लांब ठेवलं होतं. विराट- अनुष्काने २०१७ मध्ये लग्न केलं. २०१४ मध्ये एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने प्रायव्हसीबद्दल सांगितले, “आम्ही काहीही लपवत नव्हतो, आम्ही फक्त दोघे रिलेशनशिपमध्ये असलेल्या सामान्य तरूणांसारखे वागतं होतो. परंतू आम्ही सेलिब्रिटी असल्यामुळे, आमचे रिलेशनशिप हे सगळ्यांनासाठी मनोरंजनाचा विषय ठरतो. माझ्यासाठी हे पर्सनल आहे, म्हणून मला हे सगळ्यांना सांगून त्यांना कॉफी सोबत चर्चा करायला काही द्यायचे नाही. या सगळ्यामुळे मी अस्वस्थ होते.”

या आधी अनुष्काने एका न्युज पॉर्टलला गपचूप त्यांचा फोटो काढल्यामुळे टीका केली होती. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांचा गपचूप काढलेला फोटो शेअर करत त्यांना लांब राहण्यास सांगितले होते. तिने वामिकाला लाइमलाईट पासून लांब ठेवण्याचे कारण देखील सांगितले. “आम्हाला आमच्या मुलीला या सगळ्या लाइमलाईट पासून लांब ठेवायचे आहे. हे सगळे निर्णय आपल्या मुलांनी घेतले पाहिजे असे मला वाटते. कोणतं ही बाळ दुसऱ्या बाळापेक्षा वेगळं आणि विशेष नसलं पाहिजे.”

तर वामिका झाल्यानंतर थोडा वेळ तिच्या सोबत राहिल्यानंतर अनुष्काने पुन्हा एकदा शूटिंगला सुरूवात केली आहे. अनुष्का आता फक्त मासिकांचे शूट करत आहे. लवकरच अनुष्का चित्रपटात दिसेल याची प्रतिक्षा तिचे चाहते करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 2:12 pm

Web Title: anushka sharma said discussions on her personal life relationships in public make her uncomfortable dcp 98
Next Stories
1 ‘बॅक टू स्कुल’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न
2 ऑस्करनंतर आता अजून एका मानाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाचा सहभाग
3 प्रेग्नंसीमध्ये दिया मिर्झानेही अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X