News Flash

विराट नाही तर हा आहे अनुष्काचा ‘सिरिअल चिलर’ मित्र

पाहा फोटो..

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असून लवकरच ती आई होणार आहे. अनुष्का आणि विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गूडन्युज दिल्यापासून सातत्याने चाहत्यांमध्ये अनुष्काचीच चर्चा सुरु असते. त्यात अनुष्काने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

व्हायरल झालेला हा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अनुष्का झोपलेली असून तिच्यासोबत तिचा पाळीव कुत्रा आहे. “मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं घरातले सीरिअल चिलर आहोत”, अशा आशयाचं कॅप्शन अनुष्काने त्या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

आणखी वाचा : टायगर-दिशाच्या रिलेशनशिपबद्दल अनिल कपूर यांनी केलं वक्तव्य, म्हणाले..

अनुष्का लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे. प्रेग्नंसीच्या काळात अनुष्काने फिट आणि हेल्दी राहण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. मे किंवा जूनपर्यंत अनुष्का पुन्हा एकदा तिच्या आगामी प्रोजेक्टवर काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 3:28 pm

Web Title: anushka sharma shared a photo with her pet dog photo went viral dcp 98
Next Stories
1 गरोदरपणातही ‘फिटनेस फर्स्ट’! शिर्षासनानंतर अनुष्काचा ट्रे़डमीलवरचा Video व्हायरल
2 कारवाईनंतर अरबाज, सोहेल आणि निर्वाण झाले ताज हॉटेलमध्ये क्वारंटाइन
3 57 : दोन अंकांमध्ये दिया मिर्झानं व्यक्त केल्या भावना
Just Now!
X