News Flash

अनुष्का शर्माने शेअर केला हनिमूनचा पहिला फोटो

'विरुष्का' इटलीमध्येच सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली तेवढी कोणत्याच सेलिब्रिटीच्या लग्नाची झाली नसेल. इटालियन डेस्टिनेशनचे त्यांचे लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर दिसतात. पण आता त्यांच्या लग्नानंतरही त्यांच्या चाहत्यांची नजर लागली आहे ते त्यांच्या हनिमूनच्या फोटोंकडे. चाहत्यांच्या मनातील इच्छा बहुधा अनुष्काला कळली असावी म्हणून तिनेच आता त्यांच्या हनिमून ट्रीपचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनुष्काने यापूर्वीही तिच्या आणि विराटच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे वाच्यता केली नव्हती. तिने त्याच्यासोबतचा एकही फोटो फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेअर केला नव्हता. मात्र, आता लग्न झाल्यानंतर विराटसोबतचा फोटो शेअर केला आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला.

अनुष्का सध्या विराटसोबत इटलीमध्येच सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर युरोपमधील एक सेल्फी शेअर केला. विरुष्काचा हा फोटो पाहिल्यानंतर कोणाचीही नजर त्यांच्यावरुन हटत नाही हे नक्की. या फोटोमध्ये हातावरची मेहंदी आणि अंगठी विशेष लक्ष वेधून घेते. ‘सध्या स्वर्गात आहे,’ असे कॅप्शनही तिने या फोटोला दिले. याआधी विरुष्काने ‘शादी स्क्वाड’ या वेडिंग प्लॅनर कंपनीचेही आभार मानले. विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरा इटलीमध्ये लग्न केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 3:34 pm

Web Title: anushka sharma shares first photo from her honeymoon says she is in heaven
Next Stories
1 महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची जुगलबंदी!
2 अर्शीनंतर हिना खानने तोडले सामान्य ज्ञानचे तारे
3 झायराच्या ‘त्या’ व्हिडिओवर राखीने उपस्थित केला प्रश्न
Just Now!
X