News Flash

अनुष्का शर्माने वडिलांसह विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला; म्हणाली, “जगातले सर्वोत्कृष्ट पिता…”

अनुष्का शर्माने शेअर केले गरोदरपण काळातले अनसीन फोटोज. वडील आणि विराट कोहलीसाठी लिहिली स्पेशल पोस्ट.

आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या गरोदरपण काळातले अनसीन फोटो शेअर केलेत. या फोटोंसोबत एक स्पेशल पोस्ट लिहून विराट कोलली आणि तिचे वडील दोघांनाही फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा हे सैन्यात कर्नल होते. आता ते सेवेतून निवृत्त झाले आहेत. एका फोटोमध्ये तिचा बेबी बंपचा, दुसरा फोटो गरोदरपण काळात विराट कोहलीसोबतचा आणि तिसऱ्या फोटोमध्ये विराट कोहली आणि तिचे वडील अजय कुमार शर्मा दोघे एकत्र दिसून येत आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे तीन फोटोज शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अनुष्का तिचे वडील अजय कुमार शर्मा यांच्यासोबत बसलेली दिसून येतेय. तिच्या या थ्रो बॅक फोटोला पाहताच चेहऱ्यावर गोड हास्य येते. दुसऱ्या फोटोमध्ये ती विराट कोहलीसोबत दिसून येतेय. हे दोघेही एका बीचवर पोज देताना दिसून येत आहेत. तिचा हा फोटो हा गेल्या वर्षीचा वाटत आहे. जेव्हा विटार कोहली आयपीएलसाठी युएईमध्ये गेला होता, त्यावेळचा हा फोटो असावा असा अंदाज लावला जातोय. या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंप स्पष्ट दिसून येत आहेत.

हे फोटोज शेअर करताना तिने विराट कोहली आणि वडील अजय कुमार शर्मा या दोघांसाठी एक स्पेशल पोस्ट देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “दोन आदर्श पुरूष…हे दोन पुरूष जे मला मिळाले…अपार प्रेम आणि कृपेने परिपूर्ण…या बेस्ट पितांच्या मुलींकडून फादर्स डे च्या खूप शुभेच्छा…” या फोटोंमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे ११ जानेवारी रोजी एका गोंडस मुलीचे आई-वडील बनले आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे. विशेष म्हणजे विराट कोहली यंदाचा पहिला फादर्स डे आहे. अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडतोय. चाहत्या कमेंटच्या माध्यमातून पिता विराट कोहलीला फादर्स डे च्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 7:55 pm

Web Title: anushka sharma shares unseen pic from pregnancy days in fathers day post for virat kohli and her dad prp 93
Next Stories
1 Father’s Day : ‘मला माफ करा ती वेळच…’; रियाने फोटो शेअर करत मागितली माफी
2 इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी
3 ‘बुगी वुगी’मधून जिंकलेल्या ५ लाखांमधून फेडलं वडिलांवरचं कर्ज; धर्मेशने सांगितली संघर्षाची कहाणी
Just Now!
X