News Flash

रोहितच्या ‘त्या’ सल्ल्याबद्दल अनुष्काने मानले आभार

वेळात वेळ काढून अनुष्काने दिले उत्तर

रोहित शर्मा, अनुष्का शर्मा

इटलीत सोमवारी शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. सोशल मीडियावरून अनेक खेळाडू आणि बॉलिवूड विश्वातील कलाकरांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण, या सर्वांमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या एका गमतीशीर ट्विटने. विराट- अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स रोहितने या ट्विटमध्ये दिल्या आहेत. तर वेळात वेळ काढून अनुष्कानेही त्याचे आभार मानले आहेत.

‘तुम्हा दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन आणि अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस,’ असे ट्विट रोहितने केले. रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने त्याने अनुष्कालाही शर्मा हे आडनाव बदलू नकोस असा गमतीत सल्ला दिला. या ट्विटला दोन दिवसांनंतर उत्तर देत अनुष्काने त्याचे आभार मानले. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील रोहितच्या कामगिरीबद्दल तिने शुभेच्छाही दिल्या. तर विराटने मात्र अद्याप या ट्विटला कोणतेच उत्तर दिले नाही.

वाचा : इटलीतील या पंजाबी पंडितांनी लावलं ‘विरुष्का’चं लग्न 

विरुष्काने अवघ्या ४४ लोकांच्या उपस्थितीत लग्न केले असले तरी मित्र- परिवारासाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी दिल्लीत २६ डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात रिसेप्शन पार पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 8:10 pm

Web Title: anushka sharma thanks rohit sharma for post marriage advise
Next Stories
1 इटलीतील या पंजाबी पंडितांनी लावलं ‘विरुष्का’चं लग्न
2 मालमत्तेबाबत सायरा बानो यांनी केला मोठा खुलासा
3 ‘ऑफिस बॉय’ झाला गीतकार
Just Now!
X