News Flash

अनुष्का शर्मा करणार सलमान खानबरोबर रोमांस?

मॉडलिंगकडून अभिनयाकडे वळलेली अनुष्का शर्माने बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानबरोबर चित्रपटात काम करुन करियरची सुरुवात केली होती. सध्या ती राज कुमार हिराणींच्या ' पीके' चित्रपटात

| June 19, 2013 01:30 am

मॉडलिंगकडून अभिनयाकडे वळलेली अनुष्का शर्माने बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानबरोबर चित्रपटात काम करुन करियरची सुरुवात केली होती. सध्या ती  राज कुमार हिराणींच्या ‘ पीके’ चित्रपटात आमीर खानबरोबर काम करत आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच ती सलमान खानबरोबर काम करताना दिसण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात अनुष्का शर्मा दबंग सलमान खानबरोबर रोमांस करताना दिसणार आहे. गेल्यावर्षी यश राजच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाकरिता तिने सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे सर्व पुरस्कार पटकावले होते. याआधी देखील तिला सलमान खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु, काही कारणाने ते शक्य होऊ शकले नाही. सुत्रांनुसार, अनुष्का शर्माच्या शाहरुखबरोबर असलेल्या घनिष्ठ मैत्रीमुळे सलमान तीच्याबरोबर काम करण्यास संकोच करत होता. पण यावेळेस मात्र अनुष्का सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात प्रेम (सलमान)ची रुची होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 1:30 am

Web Title: anushka sharma to romance salman khan
Next Stories
1 स्पॉट फिक्सिंग वादानंतर शिल्पा दिसली स्टार अवॉर्ड कार्यक्रमात
2 दीपिकाला १०० कोटी क्लबचे आकर्षण नाही
3 युट्युबवर ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा ट्रेलर पाहिला गेला २० लाखांपेक्षा जास्त वेळा!
Just Now!
X