News Flash

उत्तराखंडला गेलेल्या विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल

चाहते या दोघांना 'विरुष्का' असेही संबोधतात

छाया सौजन्य- सोशल मीडिया

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या दोघांचेही नाते आता सर्वज्ञात झाले आहे. विराट आणि अनुष्काने सुरुवातीपासूनच त्यांच्या नात्याविषयी कोणतीही गोष्ट इतरांपासून लपवून ठेवलेली नाही. म्हणूनच अनेक सेलिब्रिटी जोड्यांपैकी विराट आणि अनुष्काची जोडी सर्वांच्याच पसंतीची आहे. सोशल मीडियावरही या दोघांचे फोटो, व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अनुष्काचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर करण्यात आला होता. त्यामागेमागच आता अनुष्काच्या सुट्ट्यांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट एकत्र दिसत आहेत.

anushka-virat-pic

उत्तराखंडला गेलेल्या विराट आणि अनुष्काचा हा पहिलाच फोटो सर्वांना पाहायला मिळत आहे ज्यामध्ये हे दोघेही एकत्र दिसत आहे. या फोटोमध्ये तेथील एक स्थानिक व्यक्तीही दिसत आहे. विराट-अनुष्काच्या या फोटोमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेकजणांनी तर विराट-अनुष्काच्या नावाला एकत्रितपणे ‘विरुष्का’ असेही संबोधण्यास सुरुवात केली आहे. ख्रिसमस सेलिब्रेशनच्या निमित्ताने उत्तराखंडमध्ये दाखल झालेले विराट-अनुष्का खासगी समारंभात साखरपुडाही करु शकतात अशी चर्चा असल्याचे वृत्त लाईव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते.

दरम्यान, विराट आणि अनुष्का उत्तराखंडमध्ये पोहचल्यानंतर दोघांचेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी ट्विटरवरुन स्वागत केले होते. विमानतळावरून विराट आणि अनुष्का गाडीने हृषिकेशच्या दिशेने गेले. हे दोघेही हृषिकेशपासून १२ किमी अंतरावर असलेल्या नरेंद्रनगर येथील आनंदा हॉटेल येथे थांबल्याचे वृत्त लाइव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिले होते. आनंदा हे पंचातारांकित हॉटेल असून ते स्पा आणि मेडिटेशनसाठी प्रसिद्ध आहे. पुढचे काही दिवस विराट-अनुष्का येथेच राहणार असल्याचे समजते. मात्र, हे दोघेही नववर्षाचे स्वागत येथेच करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आनंदा हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी ख्रिसमस पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते.

anushka-sharma-virat-kohli-759

Next Stories
1 ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक निघाले दुबईच्या सफरीला
2 PHOTOS: मुलांसोबत हृतिक-सुझानची दुबई सफर
3 अर्जुन कपूरला बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोटीस
Just Now!
X