अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा ब्रूनो हा कुत्रा साऱ्यांच्याच लक्षात असेल. विरुष्काच्या या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाला असून अनुष्काने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अनुष्काप्रमाणेच विराटनेदेखील एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
ब्रुनो हा विरुष्काचा सर्वात लाडका कुत्रा होता. बऱ्याच वेळा ते सोशल मीडियावर ब्रुनोसोबत फोटो शेअर करायचे. मात्र वयाच्या ११ व्या वर्षी ब्रुनोचा मृत्यू झाला. विरुष्कासाठी ही फारच धक्कादायक आणि दु:खद घटना आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“या ११ वर्षात आमच्या आयुष्यात आनंद, प्रेम तुझ्यामुळे आलं. हे आजन्माचं नातं तयार केलंस. आज तू आणखी चांगल्या ठिकाणी गेला आहे. देव तुझ्या आत्मास शांती देवो ब्रुनो”, अशी पोस्ट विराटने शेअर केली. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, विराट आणि अनुष्का यांनी इन्स्टाग्रामवर ब्रुनोसोबत बरेच फोटो शेअर केले आहेत. ब्रुनोव्यतिरिक्त त्यांच्याकडे एक लॅब्राडोर ड्यूडदेखील आहे. विरुष्कासाठी त्यांचे पाळीव प्राणी एका कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहे हे त्यांच्या फोटोजवरुन लक्षात येतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 6, 2020 12:53 pm