News Flash

अनुष्काने क्लिक केलेला विराटचा ‘हा’ फोटो पाहिलात का?

विराटच्या 'त्या' फोटोला ४ तासांत तब्बल ४६ हजारांहून अधिक लाईक्स

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हे ‘हॉट अँड फिट’ कपल आहे. ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विराट कोहली ज्यावेळी मैदानावर फटकेबाजी करत असतो, तेव्हा बहुतेक वेळी अनुष्का स्टेडिअममध्ये असते. आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती कायम सज्ज असते. तर दुसरीकडे अनुष्काचे चित्रपट विराट आवर्जून बघतो आणि तिला आणखी चांगला अभिनय करण्यासाठी प्रोत्साहन देतो. सध्या ही जोडी सोशल मिडीयावर खूपच अ‍ॅक्टीव्ह असल्याचे दिसत आहे.

विराटने नुकताच एक ‘स्पेशल’ फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत तो एकटाच कोणत्यातरी विचारात गढून गेल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसते आहे. त्याच्या हातात बहुधा मोबाईल असू शकतो, पण त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात काय आहे ते दिसू शकलेले नाही. पण तरीदेखील हा फोटो विराटसाठी ‘स्पेशल’ आहे. कारण या फोटोत फोटो काढणारी व्यक्ती ही विराटची पत्नी अनुष्काच आहे. तिने त्याच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेऱ्यात अचूक कैद केले आहेत. विराटने फोटोच्या कॅप्शनमध्ये तसे लिहिले देखील आहे. तसेच त्याने फोटो सौजन्य (Pic credit) म्हणून अनुष्काचे नाव दिले आहे.

दरम्यान, भारताचा विंडिज दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात भारताने एकदिवसीय, टी २० आणि कसोटी अशा तिनही प्रकारच्या मालिकेत विंडिजचा धूळ चारली. त्यावेळी अनुष्का विराटसोबत विंडिज बेटांवर होती. त्या दौऱ्या दरम्यानही विराट आणि अनुष्काने एकमेकांसोबत वेळ घालवला होता आणि फोटो काढून सोशल मिडीयावर टाकले होते. त्यांच्या ‘हॉट’ फोटोंनी नेटकऱ्यांची वाहवादेखील मिळवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:53 pm

Web Title: anushka sharma virat kohli virushka photo social media special click moment vjb 91
Next Stories
1 आलियाच्या ‘या’ फूटवेअरची होतेय चर्चा, किंमत जाणून व्हाल थक्क!
2 होणाऱ्या पतीची खिल्ली उडवणाऱ्यांना नेहा पेंडसेचं सडेतोड उत्तर
3 शाहिद पुन्हा चढणार बोहल्यावर
Just Now!
X