18 January 2018

News Flash

सोनमच्याच वाटेवर चालू लागली अनुष्का

अनुष्का सोनमला करतेय कॉपी?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 3:35 PM

सोनम कपूर, अनुष्का शर्मा

चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर फार कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा यशस्वी ठरली. अभिनयानंतर तिने चित्रपट निर्मितीतंही आपलं नशीब आजमावलं. नवनवीन गोष्टी करण्याची आवड आणि उत्साह असणाऱ्या अनुष्काने नुकतंच आणखी एका क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिची बहीण रिया कपूर यांनी मिळून एक फॅशन ब्रँड लाँच केला होता. त्यामुळे अनुष्कासुद्धा आता सोनमच्याच पावलांवर पाऊल टाकत अनुष्काने स्वत:चं ‘नुष’ हे क्लोथिंग ब्रँड आणलंय. मंगळवारी या ब्रँडचा उद्घाटन सोहळा पार पडला. यापूर्वी

‘हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी या ब्रँडसाठी काम करत आहे. एखादा नवीन प्रकल्प सुरू करताना मनात एक दडपण असतंच की, ते यशस्वी होईल की नाही. माझ्याही मनात थोडीफार भीती आहे. पण ही कल्पना मी सत्यात उतरवली याचा मला आनंदसुद्धा आहे,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.

वाचा : बिग बींच्या वाढदिवशी आराध्या देणार ‘ही’ खास भेट

जी गोष्ट आपल्याला आवडते तीच करा असा संदेश देत ती पुढे म्हणाली की, ‘मला जी गोष्ट आवडते, तेच करण्याचा नेहमी मी प्रयत्न केला. चित्रपट निर्मितीची मला आवड होती म्हणून क्लिन स्लेट फिल्म्स या माझ्या प्रॉडक्शन कंपनीअंतर्गत निर्मितीचं काम पाहिलं. त्यानंतर मी क्लोथिंग ब्रँडचा विचार केला.’

वाचा : शाहरूखला नाराज करणारं विद्या बालनचं हे वक्तव्य

सलमान खान, हृतिक रोशन, सोनम कपूरपासून बऱ्याच सेलिब्रिटींचे स्वत:चे क्लोथिंग ब्रँड आहेत. इतके ब्रँड उपलब्ध असल्याने लोकांना जास्त विविधता मिळते, असं तिचं मत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धेचा मी नकारात्मक पद्धतीने विचार करत नाही, असंही ती म्हणते.

First Published on October 4, 2017 3:35 pm

Web Title: anushka sharma walking on the path of sonam kapoor introduces her clothing line nush
  1. No Comments.