News Flash

VIDEO : अनुष्काला करायचीय शाहरुखच्या घरी चोरी; उचलणार ‘या’ तीन वस्तू

अनुष्का शर्माचा गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी अनुष्का चक्क शाहरुख खानमुळे चर्चेत आहे. तिला शाहरुखच्या तीन वस्तू चोरायच्या आहेत. या वस्तूंची नावं ऐकून तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही. अनुष्काचा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान

 

View this post on Instagram

 

The way she said ‘Le Loongi’More than co-stars, they are best friends, we all know the beautiful bond SRK and Anushka share

A post shared by Filmygyan Videos (@filmygyanvideos) on

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

हा थ्रोबॅक व्हिडीओ कुठल्याशा मुलाखतीच्या कार्यक्रमामधील आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख अनुष्काला विचारतो, जर तुला चोरी करण्याची संधी मिळाली तर तू शाहरुख खानच्या कुठल्या तीन गोष्टी चोरशील? यावर अनुष्का म्हणाली, शाहरुखच्या घड्याळांचं कलेक्शन, मन्नत बंगला आणि व्हॅनिटी व्हॅन. तिचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला. अनुष्काचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 6:05 pm

Web Title: anushka sharma wants to steal three things from shah rukh khan funny video viral mppg 94
Next Stories
1 “सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा
2 फ्रेंडशिप डे निमित्त ‘यारी दोस्ती स्पेशल संडे’
3 प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघात; रुग्णालयात उपचार सुरु
Just Now!
X