करोनाच्या लॉकडाउनमुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने १ मे रोजी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. अनुष्काने शुक्रवारी ३३ व्या वर्षात पदार्पण केले. त्या आधी दोन दिवस अभिनेता इरफान खान आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकूल होती. त्या कारणामुळेदेखील अनुष्काने वाढदिवसाचे थाटामाटात सेलिब्रेशन करणे टाळले. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची अनुष्का पत्नी असल्याने क्रिकेट विश्वातील अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. त्यात माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने तिला दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला.

लॉकडाउन स्पेशल… रोहितने भन्नाट कमेंट करत युवराजला केलं ट्रोल

युवराज सिंगने अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “रोझी भाभी, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू आयुष्यात खूप यशस्वी हो. तुला आनंदी, निरोगी आयुष्य लाभो. तंदुरूस्त राहा आणि खुश राहा”, असे अनुष्काला शुभेच्छा देताना युवराजने संदेश दिला. त्यातील रोझी भाभी शब्दाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. पण त्याने अनुष्काला रोझी भाभी कशावरून म्हटले ते मात्र अनेकांना समजले नाही.

स्टेनच्या संघात भारतीय खेळाडू नाही; डीव्हिलियर्सही संघाबाहेर

युवराजने या आधी देखील अनुष्काला रोझी भाभी म्हटले होते. काही वेळा त्याने रोझी नाव लिहून तिला टॅग देखील केले होते. एका प्रशारमाध्यमाच्या माहितीनुसार, बॉम्बे वेल्वेट हा अनुष्का शर्माचा चित्रपट होता. त्या चित्रपटात अनुष्काने रोझी नावाची भुमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भुमिकेने अनेकांची वाहवा मिळवली. त्यामुळे कदाचित तिच्या त्या भुमिकेमुळे युवराज सिंग तिला रोझी भाभी म्हणत असावा असा अंदाज आहे.

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या विराट कोहलीशी लग्नगाठ बांधली. विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. लग्नापूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधल्यापासून कायमच या दोघांची चर्चा रंगते. या दोघांचे लग्न झाल्यावर युवराजने तिला शुभेच्छा देतानादेखील रोझी भाभी असं लिहिलं होतं.

दरम्यान, विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. मात्र एकमेकांना डेट करत असताना या दोघांनी २०१५ मध्ये ब्रेकअप केलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केलं होतं. विराटला २०१५ मध्येच लग्न करायचं होतं, पण अनुष्काने त्यावेळी लग्नाला नकार दिला होता, असं म्हटलं जातं.