24 January 2021

News Flash

ते माझ्यासाठी चार वर्षे थांबले – अनुष्का शेट्टी

अनुष्का आयएएस संचलाची भूमिका साकारत असून, त्यासाठी तिने तब्बल २० किलो वजन घटवले आहे.

अनुष्का शेट्टी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली द कनक्ल्युजन’ या चित्रपटांनी तिच्या प्रसिद्धीत अधिकच वाढ केली. लवकरच ही अभिनेत्री ‘भागमती’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खरंतर हा चित्रपट खूप आधी येणे अपेक्षित होते. पण अनुष्काच्या तारखा मिळणे अवघड झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना तब्बल चार वर्षे तिची वाट पाहावी लागली, याचा खुलासा चक्क अनुष्कानेच केला.

वाचा : ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीने मांडली पाकिस्तानी असल्याची व्यथा

बऱ्याच वर्षांपूर्वी ‘भागमती’ चित्रपटाची माहिती देण्यात आली होती. पण, नंतर चित्रपटाविषयी काहीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. यामागचे कारण सांगताना अनुष्का म्हणाली की, मी २०१२मध्येच ‘भागमती’ची स्क्रिप्ट ऐकली होती. त्याला जवळपास पाच वर्षे उलटली. ‘बाहुबली’ आणि ‘रुद्रमदेवी’ चित्रपटांचे काम माझ्या हातात असल्यामुळे मी ‘भागमती’साठी तत्काळ तारीख देऊ शकत नव्हते. त्याचसोबत मला रजनीकांत यांच्या ‘लिंगा’ आणि ‘साइज झिरो’च्या चित्रीकरणालाही सुरुवात करायची होती. पण, भूमिकेविषयी माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे युव्ही क्रिएशनचे निर्माते माझ्यासाठी २०१६पर्यंत थांबले. चित्रपटात अनुष्का आयएएस संचलाची भूमिका साकारत असून, त्यासाठी तिने तब्बल २० किलो वजन घटवले आहे.

वाचा : अमिषा पटेल ट्रोल; युजरने दिला पॉर्नस्टार होण्याचा सल्ला

‘भागामती’ चित्रपटाच्या अल्बमचे नुकतेच चेन्नईत अनावरण करण्यात आले. अनुष्काचा ‘सिंघम’मधील सहअभिनेता सुरिया आणि ‘बाहुबली’मध्ये राजमाता शिवगामी देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन यावेळी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. तमिळ आणि तेलगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘भागमती’चे दिग्दर्शन अशोकने केले असून युव्ही क्रिएशनने याची निर्मिती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 10:15 am

Web Title: anushka shetty says uv creations waited for four years to start shooting for bhaagamathi since they trusted her with the character
Next Stories
1 TOP 10 NEWS : पाकिस्तानी असल्याची व्यथा मांडणाऱ्या अभिनेत्रीपासून अमिषा पटेलपर्यंत..
2 नाटक बिटक : यंदाच्या रंगमहोत्सवातून भाषा, संस्कृतीचा समृद्ध अनुभव
3 भारताचा पहिला लाइव्ह शो ‘रायझिंग स्टार २’ ला लवकरच सुरूवात
Just Now!
X