31 October 2020

News Flash

‘बाहुबली २’ चित्रपटासाठी अनुष्काने घेतले होते इतके मानधन

या चित्रपटामुळे अनुष्का जगभरात लोकप्रिय झाली

‘बाहुबली २’ या सुपरहिट चित्रपटाने खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. अनुष्काने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र संपूर्ण जगभरात तिला ‘बाहुबली २’मुळे लोकप्रियता मिळाली. आज ७ नोव्हेंबर रोजी अनुष्काचा वाढदिवस आहे. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी अनुष्का हे नाव काही नवीन नाही. आघाडीच्या नायिकांमध्ये तिचे नाव नेहमीच अग्रणी असते. बाहुबली चित्रपटाच्या यशामुळे ती घराघरात पोहोचली.

गेल्या एक दशकापासून आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अनुष्काने टॉलीवूडमध्ये २००५ मध्ये पदार्पण केले होते. अनुष्काने तिच्या करिअरमध्ये ३० हून अधिक तामिळ आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केले असल्याचे म्हटले जाते. तिच्या नावावर ‘बाहुबली’ आणि ‘रूद्रमादेवी’ सारख्या हिट चित्रपटांची नोंद आहे. अनुष्काने चित्रपटसृष्टीसाठी स्वत:चे नाव देखील बदलले आहे. अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी असे आहे. आता तिला अनुष्का शेट्टी याच नावाने ओळखले जाते.

आणखी वाचा : तब्बूला आवडायचा हा अभिनेता; दहा वर्ष होती रिलेशनशीपमध्ये

अनुष्का शेट्टी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले एक मोठे नाव आहे. ती दक्षिणेकडील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकेच नव्हे तर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये तिची गणती केली जाते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्रींचे मानधन तसे कमीच असल्याचे म्हटले जाते. पण अनुष्का याला अपवाद आहे. अनुष्का एका चित्रपटासाठी चार कोटी रूपये घेते. ‘बाहुबली २’ या सिनेमासाठी अनुष्काने तब्बल ५ कोटी रुपयांचे मानधन घेतले होते.

आणखी वाचा : शरद पवारांना आरे तुरे काय करता? जितेंद्र जोशी संतापला

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का एक योग प्रशिक्षक होती. तिने भारत ठाकूरकडून योगचे शिक्षण घेतले आहे. भारत ठाकूर हा अभिनेत्री भूमिका चावलाचा नवरा आहे. अनुष्का शेट्टी ही नेहमीच तिच्या कथित प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असते. पण तिने नेहमीच या गोष्टींवर बोलणे टाळले. काही दिवसांपूर्वी तर अनुष्काने गुपचुप लग्न केल्याचीही अफवा आली होती. त्यानंतर तिचे नाव ‘बाहुबली’ फेम प्रभास याच्यासोबतही जोडले गेले होते. प्रभास आणि अनुष्का दोघे लग्न करणार असल्याचेही म्हटले जात होते. मात्र यावर दोघांनीही कधीही जाहीरपणे भाष्य केले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 11:37 am

Web Title: anushka shetty take this much amount for bahubali 2 movie avb 95
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे सारिकाशी केले होते कमल हासनने लग्न
2 रणवीर सिंगच्या त्या ट्विटला नागपूर पोलिसांनी दिले ‘खतरनाक’ उत्तर
3 सलमान खानला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती
Just Now!
X