News Flash

नेमप्लेटवर विरुष्कासोबत वामिकाचे नाव

हा फोटो सध्या चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या घरी एका नव्या पाहुणीचे आगम झाल्याचे सांगितले होते. विरुष्काने त्यांच्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले होते. तिचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान एका नेमप्लेटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सध्या विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. ही मालिका अहमदाबाद येथे सुरु आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाची संपूर्ण टीम अहमदाबद येथील हयात हॉटेलमध्ये थांबली आहे. या हॉटेलमध्ये क्रिकेटर्सला त्यांच्या घरासारखे वातावरण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खोलीला नेमप्लेट देण्यात आली आहे. यात विराट कोहलीच्या खोलीबाहेर त्याची पत्नी अनुष्का, त्याचे आणि मुलगी वामिकाचे नाव देण्यात आले आहे.

११ जानेवारी २०२१मध्ये विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाले. विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 1:43 pm

Web Title: anushka virat kolhi daughter name vamika on homeplate avb 95
Next Stories
1 पुन्हा ‘scam’, अभिषेकच्या ‘The Big Bull’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
2 बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने केले मराठमोळ्या अक्षय इंडीकरच्या ‘स्थलपुराण’चे कौतुक
3 मालदीवमधील श्रद्धाचे हॉट फोटो व्हायरल
Just Now!
X