अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चा काही केल्या शमण्याचे नाव घेत नाहीयेत. विराट आणि अनुष्काने सोमवारी इटलीतील टस्कनी येथे एका सुरेख विवाहसोहळ्यात एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. मोजके पाहुणे, इटलीतील वातावरण पाहता विराट अनुष्काच्या लग्नासाठी एक परफेक्ट वातावरण होते, असे म्हणायला हरकत नाही. विराट, अनुष्काच्या लग्नाचे पहिले फोटो ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा त्यांच्या कपड्यांवरच अनेकांच्या नजरा खिळल्या. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने विरुष्काच्या लग्नाच्या कपड्यांचे डिझाइन केले होते. कलाविश्वात लग्नसमारंभ म्हटला की, अनेकांचीच पसंती सब्यसाचीच्या लेहंग्याला आणि पारंपरिकतेचा सुरेख नजराणा असलेल्या कपड्यांनाच असते. विरुष्कानेही त्यांच्या आयुष्यातील या खास दिवसासाठी सब्यसाचीचीच निवड केली.

https://www.instagram.com/p/BckbjtWDaMd/

https://www.instagram.com/p/BcCu_gWF80Y/

यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यात वधू-वराचे कपडे डिझाइन करण्याची संधी खुद्द सब्यसाचीनेही सोडली नाही. त्याने अतिशय कलात्मकतेने, पट्टीच्या कलाकारांची मदत घेत अनुष्का आणि विराटच्या कपड्याचे डिझाईन केले. गुलाबी, ऑफ व्हाइट, पीच अशा हलक्या पण तितक्याच मोहक रंगांचा वापर करत त्याने अनुष्काचा लेहंगा डिझाइन केला. तर विराटसाठी त्याने लेहंग्याला साजेशी शेरवानी डिझाइन केली. या पेहरावावर साजेसे दागिनेही अनुष्काच्या लूकला आणखी उठावदार करुन गेले. सब्याच्या लेहंग्यांना फक्त अनुष्कानेच नव्हे तर, कलाविश्वातील इतरही काही अभिनेत्रींनी पसंती दिली आहे. चला पाहूया नेमक्या कोण आहेत त्या सब्यसाच्या ब्राइड…

https://www.instagram.com/p/BY7TBY-lD6-/

https://www.instagram.com/p/BYw2wWAFFcH/

गजनी फेम अभिनेत्री असिननेही तिच्या लग्नाच्या वेळी सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. सोनेरी आणि मरुन रंगाच्या जरीचा तिच्या लेहंग्यामध्ये जास्त वापर पाहायला मिळाला होता.

https://www.instagram.com/p/BcZBQrZH3Eg/

अभिनेत्री बिपाशा बासूनेही तिच्या लग्नात सब्यसाचीनेच डिझाईन केलेला लेहंगा घातला होता. बंगाली नववधूच्या रुपात मंडपात आलेल्या बिपाशाच्या लेहंग्यामध्ये लाल रंगाच्या कापडावर सोनेरी जर आणि मोती, मण्यांचे नक्षीकाम शोभून दिसत होते.

https://www.instagram.com/p/BA2bSfqDCaj/

सोहा अली खान पतौडीने तिच्या लग्नाला सब्यसाची कलेक्शनला पसंती दिली होती. सोनेरी रंगाच्या लेहंग्यावर तिने फिटक केशरी रंगाची ओढणी घेतली होता. या दोन्ही रंगांच्या विरुद्ध अशा हिरव्या रंगाचा नेकलेस घातला होता.