कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे. पण ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत स्विटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर आहे. या मालिकेतून अन्विताने अनेकांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram
आणखी वाचा : बायकोला सरप्राइज द्यायला गेला अन् गायकाला झाली घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक
अन्विताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘या मुलीला जगाची पर्वा नव्हती आणि एक गोष्ट तिला माहित होती की ती हक्का नूडल्सवर प्रेम करते!’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
अन्विताने टाइमपास आणि गर्ल्स या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने रुंजी आणि चतुर चौकडी या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तिची ‘येऊ कशी तशी मी नंदायला’ या मालिकेतील स्विटू ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.
‘येऊ कशी तशी मी नंदायला’ या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे. तसेच एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 9, 2021 12:19 pm